Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

सिन्नरला सूर्यप्रेरणा सांस्कृतिक महोत्सव

सिन्नर येथे सूर्यप्रेरणा सांस्कृतिक महोत्सव कर्तबगार महिला पालकांचा सत्कार करताना एस. जी. पब्लिक स्कूलचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,सिन्नर : येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात एस. जी. पब्लिक स्कूल आयोजित सूर्यप्रेरणा सांस्कृतिक महोत्सव पार पडला.

      अध्यक्षस्थानी सुनीता गडाख होत्या. कार्यक्रमास स्वाती गडाख, संस्थेचे सचिव राजेश गडाख, संचालक ताराचंद खिवंसरा, पंचाळेचे मुख्याध्यापक विलास पवार, व्यवस्थापक राजेंद्र गडाख, प्राथमिकचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात उपस्थित होते. सिन्नरभूषण स्व. नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वाती गडाख यांनी मार्गदर्शन केले.

      यावेळी विद्यार्थ्यांनी कोळी गीते, भक्ती गीते, भांगडा, लावणी, देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. कर्तबगार महिला पालकांचा सत्कार करण्यात आला. पद्मा गडाख, योगेश चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले.

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे, किड्स विभागप्रमुख ज्योती सांगळे यांनी नियोजन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!