Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

नाशिक येथे मुंबई नाका परिसरात 150 किलो गोवंश मांस सह अल्पवयीन सह एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

मुंबई नाका गुन्हे शोध पथकाकडून दीडशे किलो गोवंश मांस जप्त करत अल्पवयीनसह एका संशयितास पथकाने ताब्यात घेतले आहे.

नाशिक प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : मुंबई नाका गुन्हे शोध पथकाकडून दीडशे किलो गोवंश मांस जप्त करत अल्पवयीनसह एका संशयितास पथकाने ताब्यात घेतले आहे. बुधवारी (ता.२१) ही कारवाई करण्यात आली. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पखाल रोड भागात एका वाहनात गोवंश मांस विक्रीस येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास सोनार यांना मिळाली. 

     वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की, पोलिस निरीक्षक (गुन्हे) साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सोनार तसेच समीर शेख, नवनाथ उगले, गणेश बोरनारे सापळा रचून होते. संशयितांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन (क्रमांक एम. एच ४६ एम ७३२१) चा पाठलाग करून पोलिसांनी काही अंतरावरच त्यांना अडविले.

      वाहनात १५० किलो गोवंश मांस आढळले. पथकाने कारवाई करत वाहन चालक अल्पवयीन मुलासह जावेद शेख (वय २६, रा. चौक मंडई, जुने नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० हजारांचे १५० किलो मांस आणि १ लाख ५० हजारांचे वाहन असा सुमारे १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!