Site icon Bhoomika Bharat News

“जिजाऊला” शाहू फुले आंबेडकर पुरस्कार!

ठाणे प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिले जाणारे सर्वोच्च प्रतिष्ठेचा सन २०२२-२३ चे “शाहू फुले आंबेडकर पुरस्कार” हा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला ७ मार्च २०२४रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात जाहीर करण्यात आला होता त्याचे वितरण मंगळवारी मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे झालेल्या एक भव्य कार्यक्रमात शासनाच्या वतीने सन्मानपूर्वक करण्यात आले

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सामाजिक न्यायच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून मुख्यमंत्री तथा मंत्री सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षेखालील गठीत समितीकडून परितोषिकासाठी संस्थेची निवड केली जाते या निवड प्रक्रियेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने गेल्या १५ वर्षे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “शाहू फुले आंबेडकर पुरस्कार २०२२-२३” यासाठी निवड करत हा पुरस्कार मुंबई येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अजित दादा पवार व सुमंत भांगे(भा.प्र.से) सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही सन २००८ पासून सातत्याने १५ वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण-आरोग्य -रोजगार -शेती,-महिला सक्षमीकरण महाराष्ट्रातील  पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात कार्य करत आहे ही संस्था कुठल्याही प्रकारचे अनुदान अथवा देणगी न घेता स्वखर्चाने आपली उपक्रम सर्वसामान्यांसाठी मोफत राबवत आहेत संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे ही आपल्या व्यवसायातल्या उत्पन्नातून ८० टक्के रक्कम ही समाजसेवेसाठी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी भावनेने खर्च करत आहे

Exit mobile version