Site icon Bhoomika Bharat News

गरूड झेप करिअर अकॅडमीच्या मुख्य शाखेवर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांचा छापा

महाराष्ट्र: छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

राज्यातील नावाजलेल्या गरूड झेप करिअर अकॅडमी वर डीसीपी नितीन बगाटे यांनी छापा टाकून संस्थेची बारकाईने पाहाणी करून आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. व संस्थे संबंधित महत्वाची रेकॉर्ड ताब्यात घेतले. संस्थेचे संचालक सुरेश सोनवणे व नीलेश सोनवणे यांनी लीना श्रीराम पाटील या तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ केला म्हणूनच तीने आत्म हत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले अशी तक्रार तीच्या पालकांनी एम.आय. डी. सी पोलिस ठाण्यात दीली त्यांच्या या तक्रारीवरून संस्था चालक यांच्या सह मॅनेजमेंटच्या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. माध्यमांशी बोलताना पोलिस उपायुक्त  बगाटे म्हणाले की, या संदर्भात योग्य ती कारवाई करून पोलिस मयत लीना पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अकॅडमी कडून अजून कोणाची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे देखील ते म्हणाले.

Exit mobile version