Site icon Bhoomika Bharat News

शहरातून दोन ठिकाणाहून दोन मोटार सायकलची चोरी

मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : शहरातील दोन विविध ठिकाणाहून दोन मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार शहर व कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

     शहरातील एटीटी हायस्कूल परिसरात कामानिमित्त आलेल्या एका यंत्रमाग मजुराची दुचाकी अनोळखी चोरट्याने चोरून नेली. यासंदर्भात जुनेद अशरफ रफिक अहमद (२९) रा. द्याने या यंत्रमाग मजुराने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने आपली एम एच 41 एई 64 71 ही दुचाकी ए टी टी हायस्कूल जवळ उभी केली होती.

ती अनोळखी चोरट्याने बनावट चावी लावून चोरून नेली. जुनेद याने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

        मालेगाव येथील बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकरीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. राहुल बापू पवार (३१) रा. जळगाव  (नि) हे बाजार समिती आवारात आले होते. त्यांनी आपली एम एच 41 झेड 24 63 ही दुचाकी बाजार समिती प्रवेशद्वार जवळ उभी केलेली होती. ती अनोळखी चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेली. राहुल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कॅम्प पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पो.हवा. आहिरे हे तपास करीत आहेत.

Exit mobile version