Site icon Bhoomika Bharat News

कलेक्टर पट्टा, निसर्ग नगर येथे हळदी कुंकू

मालेगाव/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : शहरातील प्रभाग क्र‌.११ व परिसरातील माता- भगिनींसाठी सौ. कल्पना विनोद वाघ, मा. नगरसेविका तथा माजी प्रभाग सभापती, प्रभाग क्र.११ महानगरपालिका, मालेगाव यांचे मार्फत हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

       सदर प्रसंगी सव अनितामाई भुसे यांसह परिसरातील सर्व माता भगिनी हळदीकुंकू सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद उत्सव साजरा केला सदर कार्यक्रमास सर्व माता भगिनींना स्नेह भेट व अल्पोपहार देण्यात आला.

       याप्रसंगी मा. नगरसेविकास सौ. कल्पना विनोद वाघ यांनी प्रभागातील मंजूर कामाची माहिती देत येणाऱ्या काळात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या भुयारी गटारीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची सांगितले. सदर प्रभागातील विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याने प्रभागातील माता-भगिनींनी आनंद व्यक्त केला.

Exit mobile version