Site icon Bhoomika Bharat News

त्र्यंबकेश्वर मध्ये तीन घंटागाड्यांसाठी निधी

प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर (नाशिक, त्र्यंबकेश्वर) : पर्यावरणाचा समतोल राखणे व प्रदूषण हटाव या संकल्पनेतून केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान उत्कृष्टपणे राबविण्यात केंद्र सरकारकडून त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा तीन घंटागाड्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये या घंटागाड्यांसाठी केंद्र सरकारकडून ४१ टक्के निधीची भर घालावी लागणार आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियान उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल  यापूर्वीच बक्षिसाची रक्कम त्र्यंबक नगरपरिषदेला प्राप्त झाली आहे. या तीन बक्षिसांच्या निधीतून तीन घंटांगड्यांसाठी लागणाऱ्या ४१ टक्के निधीची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहेत. त्याबद्दल नगर परिषदेचा सन्मानही झाला आहे. शहरात कचऱ्याचे विलगीकरण करून घंटागाडीमार्फत त्याची विल्हेवाट लावली जात असून,  वृक्षारोपणाच्या उपक्रमाला ही प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version