Site icon Bhoomika Bharat News

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याचे पत्र.

नाशिक: (प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर) : राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याचे पत्र त्यांच्या नाशिक वरील पत्त्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रात भुजबळ यांना मारण्याची पाच जणांनी त्यांची सुपारी घेतली असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुजबळ यांना कधी धमक्यांचे फोन, तर कधी मेसेज येत आहेत.  त्यात आता त्यांना मारण्याची थेट धमकी देणारे पत्र आलेले आहे. या पत्रात 50 लाख रुपये घेऊन ही सुपारी दिली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या पत्रात तुम्ही कुठेही फिरू नका. पाच लोक शोधात आहेत, असा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. याआधी भुजबळांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



 

Exit mobile version