Site icon Bhoomika Bharat News

नाशिकमध्ये होणार निःशुल्क कविता/गझल कार्यशाळा

नाशिक, (प्रतिनिधी- अनिकेत मशिदकर) :-  सार्वजनिक वाचनालय नाशिक तर्फे  दि. १० फेब्रुवारी रोजी  संध्याकाळी ५ ते ८ गझल/ कविता सादारीकरण करण्यासाठी डॉ. आशुतोष मुजुमदार यांची सुरेल शब्द मैफिल आयोजित करण्यात आली आहे.

कवी वैभव जोशी व गायक दत्तप्रसाद रानडे यांच्यसह संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेला कार्यक्रम “सोबतीचा करार” करणारे डॉ. आशुतोष मुजुमदार यांची तंत्र, आशय, विषय, आणि सौंदर्य यावर भाष्य करणारी   “आशयाना गझल”  ही सुरेल शब्द मैफल आहे.

डॉ. आशुतोष मुजुमदार हे गेले 30 वर्ष व्यवसायिक संगीतकार म्हणून कार्य करीत असून त्यांनी आतापर्यंत ६० पेक्षा अधिक अल्बम विविध कंपनी तर्फे काढले आहेत. सुप्रसिद्ध गायक श्री. शंकर महादेवन, श्री. कौशिक चक्रवर्ती व राहुल देशपांडे यांची सांगीतिक सुरुवात यांच्या अल्बम पासून झाली आहे. तसेच त्यांनी पं. सुरेश वाडकर, पं देवकी पंडित, पं. प्रभाकर कारेकर, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, बेला शेंडे, महेश काळे इ.  गायक, गायिकांनी गीत, गझल, भजन, सेमी क्लासिकल, फोक गीत गायिली आहेत. त्यांनी “AB & CD” या मराठी चित्रपटाला संगीत दिगदर्शन केले असून या चित्रपटात प्रथमच मराठीत सुपर स्टार अभिताभ बच्चन यांनी काम केले आहे.

अशा या बहुगुणी संगीकाराला ऐकण्याची संधी नाशिक मधील सर्व कवी/ गझलकारांनी  चुकवू नये व या निशुल्क सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे अहवान सार्वजनिक वाचनालया तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सौ. योगिनी जोशी – 9325251355

श्री. दीपक बोरसे – 8459456230

श्री. नंदकिशोर ठोंबरे – 9881074441

—-——-

Exit mobile version