Site icon Bhoomika Bharat News

राष्ट्रीय कवी संजय मुकुंद निकम यांचा 45 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मालेगाव, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर: दि 17 3.2024 रविवारी राष्ट्रकवि संजय मुकूंदराव निकम मालेगाँव जि नासिक महाराष्ट्र यांचा 45 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने बुलंदी साहित्यिक सेवा समितीच्या वतीने वरचयुअल हिंदी कवि संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनात देशभरातील नामांकित कवी व कवयित्रीनी भाग घेतला. आणि आपल्या देशभक्तीपर, प्रेमावरील कविता सादर केल्या. हे कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नवीन जी यांनी राष्ट्र कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यांचे हार्दिक अभिनंदन करून 45 वाढदिवसानिमित बुलंदी साहित्यिक सेवा समितिच्या वतीने शुभेच्छा दिल्या. राष्ट्र कवी संजय मुकूंदराव निकम याच्या आजादी मिले हुये साल 50 या कवितेने या हिंदी कवी समेलनास सुरुवात झाली.अर्चना शर्मा, भंवर लाल जैन,पूनम चौहान, रसिक खेमचंद,आदी कवी आणि कवयित्रीनी आपल्या रचना सादर केल्या. हा कार्यक्रम अतिशय उत्तम दर्जेदार असा साजरा झाला.

Exit mobile version